संजू सॅमसनसह 7 खेळाडूंना रिलीज करणार राजस्थान रॉयल्स? या 3 खेळाडूंपैकी कोण सांभाळणार राजस्थानची धुरा

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर ही फ्रँचायझी सतत मोठे बदल करताना दिसत आहे. कोचिंग स्टाफमध्ये राजस्थानने पूर्ण बदल केला आहे. आता संघातील खेळाडूंना रिटेन (ठेवणे) आणि रिलीज (सोडणे) करण्याची वेळ आली आहे. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या ट्रेडच्या बातम्यांमुळेही राजस्थानची टीम चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनसह एकूण 7 खेळाडूंना रिलीज करण्याच्या तयारीत आहे.

आयपीएल 2026 च्या तयारीसाठी राजस्थान रॉयल्स काही परदेशी खेळाडूंना टीममधून बाहेर करू शकते, जेणेकरून मिनी ऑक्शनमध्ये अधिक सक्षम खेळाडूंना घेता येईल. राजस्थानच्या रिलीज लिस्टमध्ये काही आश्चर्यचकित करणारी नावं असू शकतात.

संभाव्य रिलीज लिस्ट (सोडण्यात येणारे खेळाडू): संजू सॅमसन (ट्रेड), जोफ्रा आर्चर, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षणा, फजलहक फारुकी, कुणालसिंह राठौर, अशोक शर्मा.

संभाव्य रिटेन्शन लिस्ट (टीममध्ये कायम ठेवले जाणारे खेळाडू): रवींद्र जडेजा, सॅम करन, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, तुषार देशपांडे, नितीश राणा, संदीप शर्मा, क्वेना मफाका, आकाश माधवाल, वैभव सूर्यवंशी, शुभम दुबे, युद्धवीर सिंह, कुमार कार्तिकेय.

Comments are closed.