रिलीजआधीच ‘वाराणसी’चा डंका, डिजिटल हक्कांसाठी लागली 1 हजार कोटींची बोली
राजामौली यांनी त्यांच्या ‘वाराणसी’ या चित्रपटाचे नाव जाहीर करून एक महिनाही झालेला नाही. अवघ्या महिन्याभरात वाराणसी चित्रपटाचा चांगलाच डंका वाजू लागला आहे. एसएस राजामौली हे नाव या चित्रपटासाठी एक चर्चेचे नाव तर आहेच. शिवाय महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुखुमरन सारख्या मोठ्या कलाकारांमुळे देखील वाराणसी चर्चेमध्ये आहे. चित्रपट रिलीजला एक वर्षापेक्षा जास्त वेळ शिल्लक असतानाही, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटल हक्कांसाठी तगडी स्पर्धा करत आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या मते, “‘वाराणसी’ हा आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग मार्केटमध्ये हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. हा चित्रपट पश्चिमेकडील देशांमध्ये RRR च्या प्रचंड यशानंतर आणि ऑस्कर जिंकल्यानंतर आला आहे. राजामौली यांच्या मागील चित्रपट, बाहुबली 2 ने देखील परदेशात $62 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली होती. यामुळे राजामौली हे नाव पश्चिमेकडील देशांमध्ये एक मान्यताप्राप्त नाव आणि चेहरा बनले आहेत. स्वाभाविकच, त्यांच्या पुढील चित्रपटाच्या डिजिटल हक्कांसाठी बोली सुरू झालेली आहे. या चित्रपटासाठी जवळपास 1 हजार कोटींची बोली लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
एसएस राजामौली यांच्या “वाराणसी” या चित्रपटाचा टायटल टीझर नुकताच प्रदर्शित झाला. टीझर लाँचसाठी हैदराबादमध्ये एक ग्लोबट्रोटर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या टीझरमध्ये महेश बाबूचा दमदार लूक पाहायला मिळाला. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन आहेत, ज्यांचा लूक यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २०२७ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक जाहीर होऊन एक महिनाही झालेला नाही, परंतु “वाराणसी” ने आधीच प्रचंड हवा निर्माण केली आहे.
Comments are closed.