आशिया कपपूर्वी जसप्रीत बुमराहमुळे निवडकर्त्यांच्या डोक्याला त्रास, आता कोणाचा पत्ता कट होणार?

भारतीय संघाचा आशिया कपसाठी (Asia Cup 2025) लवकरच जाहीर होणार आहे. पण निवडकर्त्यांसाठी संघ निवडणे सोपे नाही, कारण वरिष्ठ खेळाडू नसताना ज्यांना संधी मिळाली त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखालील अलीकडच्या इंग्लंड दौऱ्यातील दमदार खेळामुळे अनेकांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे कोणाला ठेवायचं आणि कोणाला बाहेर करायचं, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) निवडकर्त्यांना सांगितले आहे की, तो आशिया कपसाठी उपलब्ध आहे. इंग्लंड मालिकेत त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि वर्कलोड लक्षात घेऊन त्याला शेवटच्या कसोटीमधून विश्रांती देण्यात आली होती. आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये असल्याने त्याला लांब स्पेल टाकावे लागणार नाहीत आणि त्याला तयारीसाठी पुरेसा वेळही मिळाला आहे. त्यामुळे निवडकर्त्यांसमोर बुमराहला परत संघात घेण्याचा प्रश्न आहे.

जर बुमराह परतला, तर कोणत्या गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण त्याच्या गैरहजेरीत अर्शदीप सिंग, आवेश खान, तुषार देशपांडे यांना संधी मिळाली आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासोबत मोहम्मद शमीच्याही निवडीवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे बुमराहच्या कमबॅकमुळे टीम सिलेक्शन अधिक कठीण होणार आहे.

Comments are closed.