आशिया कपपूर्वी टीम इंडियाचे स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळणार, कुलदीप यादवसह अनेक जण दाखवणार चमक
आशिया कपची (Asia Cup 2025) सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळणार आहे. पण त्याआधी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफीत (DPL2025) खेळताना दिसतील. दुलीप ट्रॉफीची सुरुवात 28 ऑगस्टपासून होईल आणि ती 15 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाईल. ही स्पर्धा नॉकआउट फॉरमॅटमध्ये होईल आणि यात एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. हे संघ म्हणजे नॉर्थ झोन, ईस्ट झोन, सेंट्रल झोन, नॉर्थ ईस्ट झोन, साऊथ झोन आणि वेस्ट झोन. आशिया कपच्या भारतीय संघातील काही खेळाडूही या स्पर्धेत दिसतील.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सेंट्रल झोन संघाचा भाग असेल. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep singh & Harshit Rana) हर्षित राणा नॉर्थ झोनसाठी खेळतील. तिलक वर्मा (Tilak Verma) हा साऊथ झोन संघाचा कर्णधार असेल.
याशिवाय, यशस्वी जयस्वाल, रियान पराग आणि ध्रुव जुरेल हे देखील दुलीप ट्रॉफीत खेळणार आहेत. हे सर्वजण आशिया कप संघात राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले आहेत. जयस्वाल वेस्ट झोनसाठी, रियान पराग ईस्ट झोनसाठी खेळणार तर ध्रुव जुरेल सेंट्रल झोनचा कर्णधार असेल.
दुलीप ट्रॉफी वेळापत्रक
दुलीप ट्रॉफीची सुरुवात 28 ऑगस्टला होईल.
पहिला क्वॉर्टर फायनल- नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन.
दुसरा क्वॉर्टर फायनल- सेंट्रल झोन विरुद्ध नॉर्थ ईस्ट झोन.
मागील हंगामात अंतिम फेरी गाठलेले साऊथ झोन आणि वेस्ट झोन संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
सेमीफायनल सामने- 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान.
फायनल सामना- 11 सप्टेंबरपासून.
दुलीप ट्रॉफीतील सर्व सामने बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळवले जातील.
दुलीप ट्रॉफीत दिसणारे इतर स्टार खेळाडू
या स्पर्धेत ईशान किशन, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, रजत पाटीदार, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि आकाशदीप यांसारखे मोठे खेळाडूही मैदानात उतरतील.
Comments are closed.