Before the budget session Ambadas Danve made a big statement about the post of opposition leader


3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावे-प्रतिदावे सुरू आहेत. ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठे विधान केले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त 50 जागांवर विजय मिळवता आला. या आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता दिसून आला नाही. मात्र आता 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावे-प्रतिदावे सुरू आहेत. ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठे विधान केले आहे. (Before the budget session Ambadas Danve made a big statement about the post of opposition leader)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे याना विरोधी पक्षनेते पदाबाबतीत काय नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदावर नक्कीच दावा करणार आहे. याबाबत पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करतील. तसेच आजच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करावा अशी भूमिका पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी मांडली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली.

हेही वाचा –  Uddhav Thackeray : कोकणातून पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का; रामदास कदम, योगेश कदम यांची नवी जुळवाजुळव

याचपार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांना विचारण्यात आले की, ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदाबाबत दावा केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं समर्थन मिळेल का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आता समर्थनाचा प्रश्न नाही, तर संख्येचा प्रश्न आहे. ज्या पक्षाची संख्या जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबतची पुढची भूमिका विधानसभेच्या अध्यक्षांना घ्यायची आहे. पण शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करावा अशी आमच्या पक्षाच्या सदस्यांनी भूमिका मांडली आहे. पण उद्धव ठाकरे यांनी अद्याप याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, असेही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते पदाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल

भास्कर जाधव, सुनील प्रभु आणि आदित्य ठाकरे यांची नावं विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत. तर यापैकी कोण विरोधी पक्षनेता होईल? असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले की, ही नावं फक्त तुमच्याकडे चर्चेत आहेत. आमच्याकडे अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाही. मात्र विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्याचा पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. मात्र या पदाबाबत सरकारची किंवा विरोधी पक्षाची भूमिका काय? याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणाचंही नाव दिलेलं नाही, अशी माहितीही अंबादास दानवे यांनी दिली. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून कोण विरोधी पक्षनेता होतो? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंवर रोज बोलायला वेळ नाही, फडणवीसांनी स्पष्टच सांगितले



Source link

Comments are closed.