आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या 5 खेळाडूंचा निरोप, रोहितबाबत घेणार मोठा निर्णय!
आयपीएल 2026 चे वातावरण आता तयार होऊ लागले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामासाठीचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्याआधी सर्व संघांना आपले कायम ठेवलेले खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागणार आहे. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सकडून पाच खेळाडूंना सोडण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई ज्यांना रिलीज करण्याचा विचार करत आहे, त्यात पहिले नाव रीस टॉपलीचे असू शकते. टॉपलीने एमआयसाठी फक्त एकच सामना खेळला होता. या यादीत दुसरे नाव दीपक चाहरचे असू शकते, ज्यासाठी मुंबईने तब्बल 9.25 कोटी रुपये खर्च केले होते.
मुंबई यंदा रॉबिन मिंजशीही नाते तोडू शकते. रॉबिनला एमआयने 65 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू मुजीब उर रहमानलाही मुंबई लिलावाआधी रिलीज करू शकते.
Comments are closed.