Asia Cup: भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा पराभव ठरलेला? सुपर-4 आधी जाणून घ्या हेड-टु-हेड रेकॉर्ड

आशिया कप 2025 (Asia Cup) स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तानची (IND vs PAK) पुन्हा धडाकेबाज टक्कर होणार आहे. हा सामना रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सनी हरवलं होतं आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा विजयासाठी उतरणार आहे.

भारताची इच्छा या सामन्यात जिंकून सुपर-4 मध्ये दमदार सुरुवात करण्याची असेल. याआधीच्या सामन्यात खेळाडूंनी हात न मिळवल्यामुळे पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती आणि सामना रेफरी बदलण्याची मागणी केली होती. पण प्रत्येकवेळी पाकिस्तानलाच पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे रविवारी होणारा सामना अधिक रंगतदार ठरणार आहे.

भारत-पाकिस्तान टी20 हेड-टु-हेड रेकॉर्डकडे पाहिलं तर भारताचा दबदबा स्पष्ट दिसतो. दोन्ही देश 14 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी भारताने 10 सामने जिंकले, एक सामना टाय झाला तर पाकिस्तान फक्त 3 वेळाच जिंकू शकला आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील विजय टक्केवारी तब्बल 71.42 इतका आहे. आशिया कपच्या टी20 फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमध्ये 4 सामने झाले असून त्यात भारताने 3 वेळा बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आशिया कपमधील 3 सामन्यांपैकी 2 भारताने जिंकले आहेत.

या प्रतिस्पर्धेत विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा चमकदार खेळ ठळक दिसून येते. कोहली (Virat Kohli) हा पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने 11 सामन्यांत 492 धावा केल्या असून सरासरी 70.28 आणि स्ट्राईक रेट 123.92 अशी आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध तब्बल 5 अर्धशतकं झळकावली आहेत. तर गोलंदाजीत हार्दिक पांड्याने (Hardik pandya) आघाडी घेतली असून त्याने 14 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.