तिसऱ्या वनडेपूर्वी समोर आले 3 मोठे अपडेट्स, कोहली-रोहितसाठी हा सामना ठरणार का अखेरचा?

पर्थ आणि अ‍ॅडलेडमधील पराभवानंतर भारतीय संघ आता सिडनीत आपली शान वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा तिसरा सामना 25 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा फलंदाजी क्रम आतापर्यंत फॉर्ममध्ये दिसलेला नाही. विराट कोहली संपूर्ण मालिकेत अजूनही आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले आहेत. तर कर्णधार शुबमन गिलचीही परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे.

असे मानले जात आहे की, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराट कोहली आणि रोहित शर्मा शेवटच्या वेळेस खेळताना दिसू शकतात. याच कारणामुळे सिडनी सामन्याचे सर्व तिकीटं विकली गेली आहेत. तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. कुलदीप यादव वॉशिंग्टन सुंदरच्या जागी खेळताना दिसू शकतो. तर प्रसिद्ध कृष्णालाही अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा रोमांचक सामन्यात 2 विकेट्सनी पराभव केला होता.

Comments are closed.