इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणे हे…; भावूक पोस्ट शेअर करत बेन डकेटचा IPL 2026 मधून माघार घेण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर बेन डकेटने आगामी IPL 2026 च्या हंगामातून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या महालिलावात दिल्ली कॅपिटल्सने डकेटला 2 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, पैशांपेक्षा आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला महत्त्व देत त्याने या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतले आहे.

डकेटने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले. त्याने लिहिले की, “इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न आहे. आगामी उन्हाळी सत्रातील व्यस्त वेळापत्रक पाहता, मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त राहायचे आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते, पण देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे ही माझी प्राथमिकता आहे.”

IPL 2026 – केवळ अडीच महिने चालणाऱ्या या स्पर्धेने… राजस्थान रॉयल्सच्या विक्रमी विक्रीवर सौरव गांगुली प्रतिक्रिया

या अनपेक्षित निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या नियोजनाला मोठा धक्का बसला आहे. डकेटने फ्रँचायझी आणि चाहत्यांची माफी मागत म्हटले आहे की, “मला दिल्ली संघाकडून खेळण्याची खूप उत्सुकता होती, पण परिस्थितीमुळे मला हा कठीण निर्णय घ्यावा लागला. माझ्या निर्णयामुळे संघाच्या नियोजनात जो अडथळा निर्माण झाला आहे, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.”

Comments are closed.