आयसीसीच्या 'या' नियमावर बेन स्टोक्स पुन्हा संतापला, म्हणाला….
भारत विरुद्ध इंग्लंड चाैथा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर अनेकवेळा टीका करताना दिसतो. बेन स्टोक्स बऱ्याच काळापासून स्लो ओव्हर रेटशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करत नाही. भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान, स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्या संघाचे दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुण आयसीसीने वजा केले. इंग्लंडने सामना जिंकला, परंतु स्लो ओव्हर रेटमुळे त्याला दोन महत्त्वाचे WTC गुण गमवावे लागले. यामुळे त्यांचे एकूण गुण 22 पर्यंत कमी झाले. याशिवाय, विजयाची टक्केवारी देखील कमी झाली आहे.
जगभरातील वेगवेगळ्या परिस्थिती लक्षात घेता आयसीसीने ओव्हर रेटच्या विद्यमान नियमांचा आढावा घ्यावा असे बेन स्टोक्स म्हणाला. मंगळवारी चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत स्टोक्स म्हणाला, “मी फॉर्मवर स्वाक्षरी करत नाहीये. ओव्हर रेट ही मला काळजी करण्याची गोष्ट नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की मी जाणूनबुजून वेग कमी करत आहे. याच्याशी संबंधित निराशा मला समजते, पण मला खरोखर वाटते की त्याच्या पद्धतीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
तो पुढे म्हणाले, “आशिया आणि इतर ठिकाणी तुम्ही समान नियम ठेवू शकत नाही. आशियामध्ये, फिरकी गोलंदाज सुमारे 70 टक्के षटके टाकतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये 70-80 टक्के षटके वेगवान गोलंदाज टाकतात. एका फिरकी गोलंदाजाला एक षटके टाकण्यासाठी कमी वेळ लागतो हे सामान्य ज्ञान आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही वेगवेगळ्या खंडांमध्ये ओव्हर रेट वेळ बदलण्याचा विचार केला पाहिजे. स्टोक्सचा असा विश्वास आहे की कधीकधी खेळाचा वेग कमी करावा लागतो आणि याचा ओव्हर रेटवरही परिणाम होतो. असंही तो म्हणाला.
Comments are closed.