इंग्लंडच्या कॅप्टननं सोडली दारू, बेन स्टोक्सनं घेतला मोठा निर्णय, कारण सांगत म्हणाला…

लंडन : इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यानं भारताविरुद्धची कसोटी मालिका आणि अॅशेस स्पर्धेपूर्वी मोठी घोषणा केली आहे. बेन स्टोक्सनं दारू सोडल्याची माहिती दिली. मांसपेशींच्या दुखापतीतून सावरत असताना दारु सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यानं दिली. जून महिन्यात भारत इंग्लंडचा दौरा करणार आहे. यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामने होतील. 

बेन स्टोक्सनं जानेवारी 2025 पासून दारु पिणं सोडल्याची घोषणा केली. दुखापतीतून लवकर बरं होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बेन स्टोक्सनं म्हटलं. न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. त्यामुळं डिसेंबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. 

स्टोक्सनं अनटॅप्ड पॉडकास्टमध्ये म्हटलं की, माझ्या पहिल्या दुखापतीनंतर मला त्याच्या झालेल्या वेदना आणि धक्का लक्षात आहे. तेव्हा मी विचार करत होतो की हे कसं घडलं? त्यावेळी मी विचार केला की दुखापत होण्यापूर्वी चार किंवा पाच दिवसांपूर्वी थोडी दारु घेतली होती, त्याचा परिणाम झाला आसेल.दारुमुळं कोणतीही मदत झाली नाही, असं बेन स्टोक्स म्हणाला. 

बेन स्टोक्सनं म्हटलं की त्यानंतर मी विचार केला  जे करतोय ते बदलायला हवं. स्टोक्स गेल्या वर्षी हंड्रेड टूर्नामेंटमध्ये मांसपेशीच्या दुखापतीमुळं दुखापतग्रस्त झाला होता. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना तो जखमी झाला होता. 
 
बेन स्टोक्स म्हटला की मला नाही वाटत दारु पासून पूर्णपणे दूर जाऊ शकेल. पण, 2 जानेवारीपासून दारु पिलेली नाही. मी स्वत:ला म्हटलं की जोपर्यंत दुखापतीवरील उपचार पूर्ण होत नाहीत आणि मैदानावर परत येत नाही तोपर्यंत दारु पिणं बंद करायचं, असं स्टोक्सनं म्हटलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामने 

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका जून महिन्यात सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 20 जूनपासून सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयनं भारत अ संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला पराभव स्वीकारावा लागला. यामुळं विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. आश्विन यांनी निवृत्ती घेतली आहे. भारताच्या कसोटी संघाचा कॅप्टन म्हणून सध्या शुभमन गिलचं नाव आघाडीवर आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरुवात होईल. 

Comments are closed.