शुबमन गिल नाही तर 'हा' आहे भारताच्या विजयाचा खरा हिरो! दारूण पराभवानंतर बेन स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया
टीम इंडियावर बेन स्टोक्स: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आता अत्यंत रोमांचक वळणावर येऊन थांबली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी इंग्लंडला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. या दारुण पराभवानंतर इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय संघाच्या विजयाचा खरा ‘हिरो’ कोण, हे देखील सांगितले. (India vs England Edgbaston Test)
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले, “मला वाटते की आकाश दीपने काल रात्री आणि आज सकाळी खेळपट्टीवर पडलेल्या भेगांचा चांगला उपयोग केला. सातत्याने कोन बदलण्याची आणि त्याचा फायदा घेण्याची त्याची क्षमता अविश्वसनीय आहे. तो खूप अचूक गोलंदाजी करतो. तो त्या भेगांवर लक्ष केंद्रित करत होता. आज सकाळी हॅरी ब्रूक ज्या चेंडूवर बाद झाला, त्यावर कोणताही फलंदाज काहीही करू शकला नसता.” (Ben Stokes post-match comments)
स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघ ड्रॉमध्ये विश्वास ठेवत नाही, परंतु कर्णधाराने सांगितले की, भारताने दिलेले लक्ष्य आवाक्याबाहेर होते. तो म्हणाला, “300 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव पत्करणे खरोखरच खूप मोठा फरक आहे. जेव्हा आम्ही फलंदाजीला उतरलो, तेव्हा आम्हाला माहित होते की आमच्यासमोर काय आव्हान आहे. पण काल रात्री 3 आणि आज सकाळी 2 विकेट्स लवकर गमावल्याने सर्व काही बदलले.” (Ben Stokes analyses the defeat in the second Test)
स्टोक्स म्हणाला, “या आठवड्यात त्यांनी एक अष्टपैलू संघ म्हणून चांगली कामगिरी केली, फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. मागील आठवड्यात आम्ही तसे केले होते.” (Ben Stokes praises Indian team)
Comments are closed.