AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर बेन स्टोक्सने रचला इतिहास! आजवर कोणीही करू न शकलेली केली कामगिरी
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. पर्थमध्ये पहिला सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी दोन्ही बाजूंच्या गोलंदाजांनी जोरदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) घेतल्या, तर इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (Ben Stocks) अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर मोठा इतिहास रचला.
बेन स्टोक्सने ऍशेस मालिकेत इंग्लंडचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल टाकण्याचा विक्रम केला. यापूर्वी ऍशेस इतिहासात कोणत्याही इंग्लिश कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हती.
स्टोक्सने पहिल्या दिवशी फक्त 6 षटके टाकले आणि 23 धावा देत 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले. या स्पेलमध्ये त्याने 1 मेडन षटक टाकलं आणि फक्त 3.83 इकॉनॉमी ठेवली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने शानदार खेळी केली. त्याने 12.5 षटकांमध्ये 7 इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मात्र गोलंदाजीपूर्वी फलंदाजी करताना स्टोक्स काही खास करू शकला नाही. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तो फक्त 6 धावांवर (12 चेंडू) क्लीन बोल्ड झाला. पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडची संपूर्ण टीम 32.5 षटकांमध्ये 172 धावांवर बाद झाली. हॅरी ब्रूकने सर्वाधिक 52 धावा केल्या, तर ओली पोपने 46 धावा केल्या.
123 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस 39 षटकांमध्ये 123 धावा केल्या आहेत. सध्या ते इंग्लंडपेक्षा 49 धावांनी मागे आहेत. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाला शक्य तितक्या लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतील.
Comments are closed.