चॅम्पियन्स ट्राॅफी पूर्वी इंग्लंडला धक्का! कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गंभीर दुखापती

इंग्लंड क्रिकेट बोर्ड अर्थात ECB ने भारत दौऱ्यासाठी आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघाची घोषणा केली तेव्हा त्यात कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सचे नाव नव्हते. जो रूटचे वनडे संघात पुनरागमन झाले असले तरी बेन स्टोक्स मात्र मर्यादित चेंडूच्या क्रिकेटपासून दूर राहणार आहे. एवढेच नाही तर दुखापतीमुळे तो पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. खुद्द इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात बेन स्टोक्सला दुखापत झाली होती.

इंग्लंड क्रिकेट बोर्डने एक मीडिया रिलीझ जारी केले आहे की इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याची पुष्टी झाल्यानंतर त्याला किमान तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. डरहमच्या या अष्टपैलू खेळाडूवर जानेवारीत शस्त्रक्रिया होणार आहे. यानंतर त्याला पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागेल. त्यानंतरच तो परत येऊ शकतो. स्टोक्सला हॅमिल्टनमधील तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. जी इंग्लंडने नुकतीच न्यूझीलंडमध्ये 2-1 अशी कसोटी मालिका जिंकली होती.

अष्टपैलू बेन स्टोक्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल. असे मानले जात होते, मात्र दुखापतीमुळे तो यावेळी आयसीसी स्पर्धेला मुकणार आहे. संघाची घोषणा करताना ईसीबीने सांगितले होते की, दुखापतीमुळे स्टोक्स निवडीसाठी उपलब्ध नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात तो शेवटची फलंदाजी करण्यासाठी उतरला मात्र त्याने गोलंदाजी केली नाही. चांगली गोष्ट म्हणजे पुढील मायदेशातील मोसमापूर्वी तो तंदुरुस्त होईल. कारण इंग्लंडला पुढच्या वर्षी भारताविरुद्ध मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

हेही वाचा-

रोहित शर्माने दुखापतीबाबत दिला मोठा अपडेट, जाणून घ्या चौथी कसोटी खेळणार की नाही?
IND vs AUS: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11, या खेळाडूला संधी मिळणार?
‘मी जिवंत आहे’, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विनोद कांबळीची प्रतिक्रिया समोर

Comments are closed.