Early Dinner Benefits: रात्री उशिरा जेवताय? वेळीच सावध व्हा,जाणून घ्या जेवणाची योग्य वेळ

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांचा रात्री उशिरा जेवण्याचा सवयीनिवृत्ती झाली आहे. दिवसभर काम करून थकलेले शरीर जेव्हा शांत बसतं, तेव्हा आपण जेवणासाठी वेळ काढतो. पण हेच जेवण जर वेळेवर नसेल, तर ते आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतं, हे अनेकांना माहीतच नसतं. (benefits of early dinner for good health)

तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, रात्री 7 वाजण्याच्या आत जेवण केल्यास शरीराच्या पचनक्रियेला, झोपेच्या चक्राला आणि संपूर्ण आरोग्याला चांगला फायदा होतो. उशिरा जेवल्यास केवळ अपचन नव्हे तर हृदयरोग, टाईप 2 मधुमेह, लठ्ठपणा, झोपेचे विकार अशा अनेक आजारांची शक्यता वाढते.

लवकर जेवण्याचे फायदे:

1) पचन सुधारते
रात्री लवकर जेवल्यास अन्न व्यवस्थित पचतं. त्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, पोटफुगी यांसारख्या समस्या दूर राहतात आणि झोपही चांगली लागते.

2) रक्तातील साखरेवर नियंत्रण
लवकर जेवल्यास रात्रीची ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहते. यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होतं आणि मधुमेहाचा धोका टळतो.

3) वजन कमी करण्यास मदत
जेव्हा जेवण आणि नाश्ता यामध्ये चांगला अंतर ठेवला जातो, तेव्हा शरीराची चयापचय क्रिया सक्रिय होते आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहते.

4) हृदयासाठी फायदेशीर
उशिरा जेवल्यास रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. पण लवकर जेवल्यास हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात. ते आपल्या झोपण्याच्या आणि जागे होण्याच्या चक्रावर परिणाम करतं. जेव्हा आपण हाच रिदम अनुसरून संध्याकाळी 7 वाजण्याआधी जेवतो, तेव्हा शरीराला अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य वेळ मिळतो. त्यामुळे रात्री शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जातं आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं.

सध्याचं जीवनशैलीचं गणित लक्षात घेतल्यास संध्याकाळी लवकर जेवण करणं अशक्य वाटू शकतं. पण थोडं संयोजन, थोडं नियोजन आणि आरोग्याविषयी जागरूकता यामुळे तुम्ही ही सवय अंगी बाणवू शकता.

Comments are closed.