बंगालच्या डीजीपींना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्धनाथ गुप्ता यांचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. सोमवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार, केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) सिद्धनाथ गुप्ता यांची सेवा त्यांच्या 30 एप्रिलच्या नियोजित सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.

सिद्धनाथ गुप्ता हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते 30 एप्रिल 2026 रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवडणूक आयोगाने मार्च महिन्यात सिद्धनाथ गुप्ता यांची बंगालचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केली होती. विद्यमान डीजी पियुष पांडे यांना पदावरून हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने त्यांची राज्याचे डीजी आणि आयजीपी म्हणून नियुक्ती केली होती. राज्याच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देत गुप्ता यांचा कार्यकाळ वाढवला आहे.

 

Comments are closed.