Bengal Girl Sexual Assualt बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणी ज्याला जमावाने क्रूरपणे संपवलं तो निर्दोष असल्याची मु्ख्यमंत्री अधिकारी यांची माहिती
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी सांगितले की, १२ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या केल्याच्या संशयावरून रविवारी बारुईपूरमध्ये जमावाने मारहाण करून ठार केलेला २६ वर्षीय तरुण निर्दोष आढळला आहे. “ज्या माणसाला जमावाने मारले तो निर्दोष होता, असे पोलिसांनी मला सांगितले,” असे मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले.
“पोलिसांच्या वाहनांचे नुकसान करणाऱ्या आणि रेल्वे रुळ उखडून टाकणाऱ्या सुमारे २०० जणांची ओळख पटली आहे. त्या सर्वांना अटक केली जाईल… पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड मिळवले आहेत,” असे ते पुढे म्हणाले.
बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी, १२ वर्षीय मुलीचा मृतदेह एका तलावातून बाहेर काढण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर, इंद्रजित तांती नावाच्या एका व्यक्तीला जमावाने मारहाण करून ठार केले.
“मी दोन्ही कुटुंबांना भेटलो. सरकार आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मदत मागितली असून, परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्यासह काही मागण्याही केल्या आहेत. मी एका आठवड्याच्या आत बारुईपूरला परत येईन,” असे मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले.
जमावाने संपवलं अन् एफआयआर
पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि तिची हत्या, तसेच एका व्यक्तीला जमावाने मारहाण करून ठार मारल्याच्या घटनेसह चार प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवले आहेत. तीन जणांना अटक करण्यात आली असून, इतर तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अधिकारी याबाबत बोलताना म्हणाले “मला नाही वाटत की (राज्यातील) कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी यापूर्वी पीडित कुटुंबांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असेल… मी स्थानिक खासदार आणि आमदारांना (दोघेही तृणमूल काँग्रेसचे) आमंत्रित केले होते आणि त्यांनाही भेटलो. भारतीय जनता पक्षाचे तीन आमदारही आले होते,” असे ते म्हणाले.
बरुईपूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत वर्च्युअल मिटींग घेतली. “मी राज्यातील सर्व ओसींसोबत एक वर्च्युअल मिटींग घेतली. अशा घटना रोखणे आवश्यक असून त्यांनी कायदा, योग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देशांचे पालन केले पाहिजे, असे मी त्यांना सांगितले,” असे ते म्हणाले.
Comments are closed.