चेंगराचेंगरीनंतर बंगाल सरकार 'ऍक्शन मोड'मध्ये
3 दुर्गा पूजा मंडपांसाठी अग्निसुरक्षा सूचना:
वृत्तसंस्था, कोलकाता
कोलकात्यातील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 19 जणांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगाल सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. राज्याच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने दक्षिण कोलकात्यातील तीन दुर्गा पूजा समित्यांना नोटीस जारी केली आहे. या मंडपांमध्ये अग्निसुरक्षेवरून करण्यात आलेल्या व्यवस्थेत त्रुटी आढळून आल्या आहेत. अग्निशमन पथकाने मंडपांच्या पाहणीनंतर चेतला अग्रणी, बालीगंज कल्चरल असोसिएशन आणि त्रिधारा सम्मिलनीला सोमवारी नोटीस जारी करण्यात आली.
अग्निशमन दलाने रविवारीच मंडपांनजीक निर्मित तात्पुरती व्यावसायिक संरचना आणि धोकादायक स्टॉल्सना त्वरित हटविण्याचे निर्देश दिले होते. खासकरून ज्वलनशील सामग्रींनी निर्मित मंडपांनजीक एलपीजी सिलिंडरच्या उपस्थितीबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. बालीगंज कल्चरल असोसिएशनचे वक्तवय बालीगंज कल्चरल असोसिएशनला अधिकाऱ्यांनी मंडपातील प्रकाशव्यवस्था सुधारण्याची सूचना केली.
तसेच व्यावसायिक घडामोडींमुळे प्रवेश अन् बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे निर्माण न होण्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे. आम्ही सुरक्षा खबरदारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीवरून सर्व मानक प्रक्रियांचे पालन करत आहोत. आम्ही प्रकाशव्यवस्थेत सुधार केला असून मार्गात कुठलेच अडथळे येणार नसल्याचे निश्चित केल्याचे पूजा समितीच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
व्हेंटिलेशन अन् लाइन मॅनेजमेंटवर जोर
निरीक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी मंडपांमध्ये पुरेसा प्रकाश आणि व्हेंटिलेशनच्या आवश्यकतेवर जोर दिला. गर्दी अन् श्वास कोंडण्यासारख्या स्थितींपासून वाचण्यासाठी पुरेसे पंखे आणि एसी युनिट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आम्हाला उद्घाटनापूर्वीच एनओसी मिळाली होती. आम्ही अत्यंत ज्वलनशील सामग्रीचा वापर केलेला नाही आणि प्रवेशद्वारापासून मार्गांपर्यंत योग्य प्रकाशव्यवस्था केलेली आहे. गर्दी नियंत्रणाशी निगडित सर्व उपायांचे पालन केले जात असल्याचे आम्ही कळविले आहे असे त्रिधारा सम्मिलनीचे वरिष्ठ पदाधिकारी देवाशीष कुमार यांनी सांगितले.
Comments are closed.