दिवाळीतच शेजारच्या फ्लॅटमधून येऊ लागला वास; शेजाऱ्यांनी खिडकी तोडली, दोन मृतदेह दिसले, बेंगळुरू


बेंगळुरू: आयटी सिटीमध्ये भाड्याच्या घरात एका लिव्ह-इन जोडप्याचे मृतदेह (Live-in Couple Found Dead At Home) आढळले. भांडणानंतर झालेल्या आत्महत्येचा हा प्रकार असावा असा पोलिसांना संशय आहे. ओडिशाचे रहिवासी असलेले सीमा नायक (२५) आणि राकेश नायक (२३) असे या जोडप्याचे नाव आहे. त्या भाड्याच्या घरात हे जोडपे  (Live-in Couple Found Dead At Home) मृतावस्थेत आढळले. राकेश एका सिक्योरिटी कंपनीत काम करत होता, तर सीमा जवळच्या सुपरमार्केटमध्ये काम करत होती. (Live-in Couple Found Dead At Home)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कदाचित दोन दिवसांपूर्वी घडली असावी, परंतु सोमवारी शेजाऱ्यांनी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची आणि घरात कोणतीही हालचाल नसल्याची तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी खिडकी फोडली आणि त्यांना हे जोडपे मृतावस्थेत आढळले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की राकेशला मद्यपान करण्याची सवय होती आणि त्यावरून दोघेही अनेकदा वाद घालत होते.

Crime News: त्यांच्यासोबत राहणारा एक मित्र घर सोडून गेला

जोडप्यासोबत राहणारा त्यांचा एक मित्र शुक्रवारी अशाच दोघांच्या वादानंतर घर सोडून गेला. राकेशने भांडणानंतर आत्महत्या केली असावी, ज्यामुळे सीमानेही आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी राकेश गळफास घेतल्याचे दिसून येते. नंतर, सीमाने चाकूने दोरी कापण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिनेही गळफास घेतला, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. शेजारी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, राकेशला दारूचं व्यसन होतं आणि रविवारी त्याची सीमासोबत भांडणं झाली होती.

Crime News: फास सोडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला

“फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या तज्ज्ञांच्या मते, रविवारी मध्यरात्रीनंतर हे मृत्यू झाले आहेत. सीमाने राकेशला लटकताना पाहिले आणि फास सोडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला असा आम्हाला संशय आहे. जेव्हा तिला कळले की तो मृत आहे, तेव्हा तिने गळफास घेतला,” असे एका तपास पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

राकेशच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एकीने सांगितले की, राकेशला सीमावरती संशय होता. “राकेशने मला सांगितले की सीमा दुसऱ्या पुरुषाला पैसे ट्रान्सफर करत होती आणि म्हणूनच तो तिच्यावर संशय घेत होता. दररोज, ते यावरून एकमेकांशी भांडत असत,” टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. ते ओडिशामधील मृताच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.