Big Breaking: पावसाने खेळ बिघडवला, RCB-SRH सामना बंगळुरूमध्ये नाही तर 'या' मैदानावर होणार

प्रतिकूल हवामानामुळे, मंगळवारी (20 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यातील आयपीएल 2025चा सामना बंगळुरूहून लखनऊला हलवण्यात आला आहे. आरसीबी शुक्रवारी (23 मे) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाचे आयोजन करणार होते, परंतु, आता हा सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

आरसीबीचा शनिवारी (17 मे) बंगळुरू येथे गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि या आठवड्याच्या अखेरीस कर्नाटक राज्याच्या राजधानीतही पावसाची शक्यता जास्त आहे.

रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखालील संघासाठी एसआरएच विरुद्धचा सामना मोठा आहे कारण जर बंगळुरूने या संघाविरूद्ध 2 गुण मिळवले तर त्यांना गुणतालिकेत टाॅप-2 मध्ये स्थान मिळवण्याची आणि पहिल्या पात्रता फेरीसाठी पात्रता मिळवण्याची शक्यता वाढेल. आरसीबीचा शेवटचा लीग सामनाही लखनऊमध्ये होणार आहे. यावेळी संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील एलएसजी संघाचा सामना करेल.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, “मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूला जाणाऱ्या एसआरएच संघाला आरसीबी सामन्यासाठी लखनऊमध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बंगळुरूमधील हवामान खात्याने जारी केलेल्या यलो अलर्टमुळे उशिरा हा बदल आवश्यक झाला आहे, ज्यामध्ये गुरुवारपर्यंत शहरात “मुसळधार ते अति मुसळधार पाऊस” पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.”

Comments are closed.