इस्रायल गॅसवर नेतन्याहू सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार

सीरियाविरोधात युद्ध सुरू असतानाच इस्रायलमध्ये बेंजामीन नेतन्याहू यांना धक्का बसला आहे. आठवडाभरात दुसऱया पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने नेतन्याहू यांचे सरकार अल्पमतात आले आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते.

इस्रायलमध्ये सध्या नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली उजव्या आघाडीचे सरकार आहे. यातील युनायटेड तोराह ज्युडिइज्म पक्ष मागील आठवडय़ात सरकारमधून बाहेर पडला. त्यानंतर आता शास पक्ष बाहेर पडला आहे. येशिवा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना इस्रायली लष्करी सेवेच्या सक्तीतून वगळणारा कायदा करण्यात नेतन्याहू यांना अपयश आल्याने शासने हा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.