Health Tips: गणपती बाप्पाच्या दुर्वा केसांसाठी नैसर्गिक वरदान

गणपती बाप्पाची पूजा ही दुर्वा अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. या दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय असल्याचे बोलले जाते. मात्र धार्मिक पूजेसाठी वापर होत असलेल्या दुर्वा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. या हिरव्यागार दुर्वा केसांसाठी एक नैसर्गिक टॉनिक आहेत. केसांच्या समस्यांवर महिला अनेकदा बाजारातील महागडे प्रोडक्ट्स वापरतात मात्र तरीही या समस्या दूर होत नाहीत. आयुर्वेदात दुर्वेला औषधी वनस्पतींच्या श्रेणीत गणले जाते. त्यामुळे सहज उपलब्ध असणाऱ्या या दुर्वांचा वापर तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्कीच करू शकता.

पोषणाचा स्रोत

दुर्वा म्हणजे फक्त एक गवत नसून पोषक तत्वांची खाण आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A आणि C यांसारखी पोषक तत्त्वे असतात, जी केसांना मुळांपासून पोषण देतात. केस गळतीवर हा एक नैसर्गिक उपाय आहे.

नैसर्गिक चमक

दूर्वांमुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. दुर्वाचा हेअरमास्क केसांसाठी अतिशय गुणकारी ठरतो. शिवाय केसांमध्ये झालेला कोंडा कमी करण्यासाठी दुर्वाचा वापर करावा. यामुळे केस सुंदर होतात.

दुर्वांचा हेअर मास्क कसा तयार करावा?

सर्वात आधी दुर्वा मिक्सरमध्ये थोड्या पाण्यासोबत बारीक वाटून घ्या. तयार पेस्ट एका स्वच्छ बाऊलमध्ये काढून ठेवा. अधिक पोषणासाठी यामध्ये एखादं चमचं खोबरेल तेल किंवा थोडं कोरफड घालता येईल. ही हिरवीगार पेस्टच तुमचा केसांसाठी अत्यंत उपयुक्त असा नैसर्गिक हेअर मास्क आहे.

हा तयार हेअर मास्क बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांवर आणि स्काल्पवर नीट लावा. त्यानंतर ५-१० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. या प्रक्रियेमुळे पोषणद्रव्यं खोलवर मुळांपर्यंत पोहोचतात. हेअर मास्क लावून २०-३० मिनिटे ठेवून नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

Comments are closed.