धारावीत बेस्ट बस दुभाजकावर चढली, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईची ‘जीवनवाहिनी’ समजल्या जाणाऱया ‘बेस्ट’ बसचा प्रवास मागील काही दिवसांत वारंवार घडत असलेल्या अपघातांमुळे असुरक्षित बनला आहे. त्याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच सोमवारी धारावीतील गजबजलेल्या 90 फूट रोडवर बेस्टची बस रस्ता दुभाजकावर चढली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बस मार्ग क्र. 341 वर धावणारी ही बस गोरेगाव पूर्व येथून अंटॉप हिलच्या दिशेने जात होती. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्ता दुभाजकावर चढली.

धारावीतील मुख्य रस्त्यावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकावर जाऊन आदळली. सुदैवाने, हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये कमी प्रवासी होते. बस दुभाजकावर चढल्यामुळे इतर गाडयांना धडक बसण्यापासून टळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत चालकाला मदत केली. मात्र, भरवस्तीत घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिक तसेच बेस्ट प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. 26 मार्च रोजी लोअर परळ येथील कमला मिल्स परिसरातही अशाच प्रकारचा अपघात झाला होता. एकामागून एक होणाया या अपघातांमुळे बेस्ट प्रशासनाच्या मेंटेनन्स आणि चालक प्रशिक्षणावर टीका होऊ लागली आहे. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या तीन वर्षांत बेस्ट बसच्या अपघातांची संख्या 958 वर पोहोचली असून त्यात 77 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Comments are closed.