बेस्ट बसच्या धडकेत पुजाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बेस्ट बस अपघाताचे सत्र काही केल्या थांबायचे नाव नाही. कुर्ला, मुलुंड येथे बेस्ट बसच्या मोठय़ा अपघाताच्या घटना ताज्या असतानाच वरळी आणि चेंबूर-सांताक्रुझ लिंक मार्गावर बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात एका 55 वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू झाला.

त्रिविक्रम श्रीपाद आचार्य असे त्या पुजाऱयाचे नाव असून ते कुर्ला नेहरूनगर येथे राहत होते. गुरुवारी दुपारी 12.40 च्या सुमारास  आचार्य त्यांच्या दुचाकीवरून चेंबूर-सांताक्रुझ लिंक मार्गावरून जात होते. त्यावेळी वेगात आलेल्या इलेक्ट्रीकल बेस्ट बसने त्यांना धडक दिली. या धडकेत आचार्य खाली पडल्यानंतर त्यांच्या अंगावरून बस गेली. यात गंभीर जखमी झालेल्या आचार्य यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून बस चालकाला अटक केली. दोन दिवसांपूर्वी वरळी येथे देखील बेस्ट बसचा अपघात झाला होता.

Comments are closed.