Monsoon Travel : पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणे
पावसाळा सर्वाचाच आवडता ऋतू. उन्हाच्या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी सर्वचजण आतुरतेने पावसाची वाट पाहत असतात. या ऋतूतील वातावरण मनाला प्रसन्न करणारे असते. अशा वातावरणात आपला थकवा दूर होऊन मनाला आणि शरीराला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. पावसाळा आणि सहल एक समीकरणच आहे. रोजच्या दगदगीतून थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी अनेकजण शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात जाणे पसंत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले अशी काही ठिकाणे सांगणार आहोत, जेथे तुम्ही पावसाचा मनमुराद आनंद लुटालच शिवाय तुमची पिकनिक बजेटमध्ये देखील बसेल. चला तर मग जाणून घेऊयात ही बजेटमध्ये ठिकाणे कोणती आहेत (Best places to visit in Maharashtra during monsoon).
लोणावळा – खंडाळा (Lonavala – Khandala)
लोणावळा आणि खंडाळा ही ठिकाणे पावसाळ्यात फिरण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत. येथे तुम्हाला धबधबे आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येईल.
माथेरन
माथेरान हे मुंबईजवळील ठिकाणे आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला ट्रेकिंग, घोडेस्वारी आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देता येईल.
महाबळेश्वर (Mahabaleshwar)
महाबळेश्वर हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला ताज्या स्ट्रॉबेरींचा आस्वाद घेता येईल. येथील टेकड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार दऱ्या तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील.
मालशेज घाट
माळशेज घाट हे पावसाळी पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्हाला हिरवागार निसर्ग आणि धबधबे पाहता येतील. रोडट्रिपसाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे.
पन्हाळा (Panhala)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे तुम्हाला निसर्गरम्य दृश्ये, प्राचीन दरवाजे, बुरूज आणि अंबरखाना पाहता येईल.
चिखलदरा (Chilkhaldara)
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जाते. येथे तुम्हाला वन्य प्राणी पाहता येतील.
अंबोली (अंबोली)
समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले अंबोली हे ठिकाण आहे. अंबोलीपासून जवळ इतरही प्रसिद्ध ठिकाणे तुम्हाला पावसात पाहता येतील. येथील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असते.
हरिहार किल्ला
पावसाळ्यात फिरण्यासाठी हे ठिकाण अतिशय भन्नाट आहे. त्र्यंबकेश्वरजवळ हरिहर किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायऱ्या चढण्यासाठी कठिण आहेत. पण, येथील निसर्ग तुमचा थकवा दूर करणारा आहे.
मुळशी धरण (Mulshi Dam)
पूणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी मुळशी धरण एक आहे. येथे पर्यटक पावसाळ्यात तुफान गर्दी करतात.
भंडारदरा (Bhandardara)
भंडारदरा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हे निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध हवा यांचा आनंद घेता येईल.
हेही पाहा –
Comments are closed.