2025 ची सर्वोत्तम टी-20 प्लेइंग इलेव्हन समोर! टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना स्थान, तर हार्दिक पांड्याचा पत्ता कट
2025 मध्ये टी-20 क्रिकेटची क्रेझ सातत्याने वाढत आहे. या वर्षात भारतीय संघाने या फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. नुकतीच 2025 ची सर्वोत्तम टी-20 प्लेइंग 11 समोर आली आहे. यामध्ये 3 भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे, मात्र स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik pandya) या संघात जागा मिळालेली नाही. या संघात भारताप्रमाणेच इंग्लंडच्या 3 आणि वेस्ट इंडिजच्या 2 खेळाडूंचा समावेश आहे.
सलामीवीर म्हणून भारताच्या अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आपले स्थान पक्के केले आहे, त्याने यावर्षी स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याच्यासोबत इंग्लंडचा फिल सॉल्ट सलामीला असेल.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ने तिसऱ्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला ठेवले आहे, तर चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आहे. विशेष म्हणजे पूरनला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस आहे. फिनिशरच्या भूमिकेत ऑस्ट्रेलियाचा टिम डेविड आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून सॅम करन आणि जेसन होल्डर यांनी संघात स्थान मिळवले आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा नूर अहमद आणि भारताचा वरुण चक्रवर्ती यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह करणार आहे.
2025 ची सर्वोत्तम टी-20 प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), निकोलस पूरन (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, सॅम करन, जेसन होल्डर, नूर अहमद, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
Comments are closed.