International Yoga Day 2025 : डोकेदुखी कमी करणारी योगासने
डोकेदुखी ही आरोग्याशी निगडीत एक समस्या आहे. हल्ली वाढता स्क्रीनटाईम, रोजची धावपळ, चुकीचं खाणं-पिणं यामुळे अनेकांना रोजचं डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून अनेकजण मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊन तात्पुरती डोकेदुखी थांबवतात. पण, असे सतत डोकेदुखीवर औषधे-गोळ्या घेणे योग्य नाही. यावर काही घरगुती उपाय करता येतील, त्यापैंकी एक म्हणजे योगाचा सराव करणे. डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी योगासने सर्वात प्रभावी उपाय आहे. या आसनांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईलच शिवाय डोकेदुखीपासून आराम मिळेल. आज आपण जाणून घेऊयात डोकेदुखी कमी करणारी सोपी योगासने
पाश्चात्य आसन –
करण्याची पद्धत –
- पाय समोर पसरवून बसा.
- श्वास घेताना हात वर करा.
- श्वास सोडताना पुढे पाकून पायाची बोटे धरा.
- कपाळाला गुडघ्यांपर्यंत स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
- कमीत कमी मिनिटभर या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.
फायदे –
- पाठ आणि मानेच्या नसा ताणतात, ज्यामुळे ताण कमी होतो.
- मेंदूला थंडावा मिळतो आणि संतुलन मिळते.
पवन मुक्तसन –
- पवन मुक्तासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय एक एक करून वाकवा.
- यानंतर गुडघे छातीवर आणा आणि त्यांना हातांनी धरा.
- तुमचे डोके वर करा आणि नाक गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
- ही स्थिती 4 ते 5 वेळा करावी.
फायदे –
- पचनाशी संबंधित समस्या असतील तर हे आसन करावे.
- शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पवन मुक्तासन करावे.
- थकवा आणि डोकेदुखीवर तर हे आसन रामबाण उपाय आहे.
बालासन –
- बालासन करण्यासाठी चटईवर बसा.
- दोन्ही पायांची बोटे एकत्र ठेवा आणि गुडघे पसरवण्याचा प्रयत्न करा.
- यानंतर श्वास घेताना वरच्या दिशेने ताण द्या आणि श्वास सोडताना शरीर पुढे वाकवा.
- कपाळ जमिनीवर ठेवा आणि हात पुढे ताणा.
- या आसनात 1 ते 2 मिनिटे रहा आणि खोल श्वास घ्या.
फायदे –
- मेंदूमध्ये रक्ताभिसरण वाढते.
- मन शांत होते आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.
हेही पाहा –
Comments are closed.