गाण्याच्या कार्यक्रमात नाचताना स्टेज तुटला, मिंधे गटाच्या आमदारासह कार्यकर्ते खाली पडले

सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरू आहे. नवरात्रीनिमित्त मिंधे गटाचे भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान आमदार भोंडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते स्टेडवर नाचत असतानाच स्टेट तुटला. यात आमदार भोंडेकरांसह त्यांचे कार्यकर्ते खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पवनी शहरात भोंडेकर यांच्या वतीने शहनाज अख्तर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते स्टेजवर चढून नाचू लागले. नाचत असतानाच अचानक स्टेज तुटला आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह काही कार्यकर्ते खाली कोसळले. यात काहींना मोठी दुखापत झाली असल्याचं बोलले जात आहे. तर आमदार यांना किरकोळ इजा झाली आहे.

Comments are closed.