पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत नागल, बोपन्ना, भांब्री भिडणार

भारत पेट्रोलियम यांच्यातर्फे 44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत हिंदुस्थानी ऑलिम्पिकपटू रोहन बोपन्ना, सुमित नागल, अंकिता रैना, वैष्णवी आडकर, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, प्रार्थना ठोंबरे यांसह डेव्हिस कूपर युवी भांब्री, विष्णू वर्धन हे स्टार हिंदुस्थानी टेनिसपटू भिडणार आहेत. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर 5 ते 8 नोक्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.या स्पर्धेत 100 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

Comments are closed.