भारती सिंगच्या पतीने दिले 20 लाखांचे घड्याळ, यावर आश्चर्यचकित प्रियांका चोप्रा काय म्हणाली, वाचा

कॉमेडी क्वीन भारती सिंग सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. नुकतेच्या भारतीच्या पतीने हर्ष लिंबाचियाने तिला एक अतिशय खास गिफ्ट दिले. हे गिफ्ट घड्याळ असून हे साधे सुधे घड्याळ नसून, तब्बल 20 लाखांचे घड्याळ आहे. Bvlgari Serpenti Tubogas या ब्रॅंडचे हे घड्याळ असून, याची किंमत अदमासे २०.५० लाख आहे.

हर्षची भेट पाहून भारती भावुक झाली. तिने तिच्या YouTube व्लॉगवर घड्याळ दाखवून तिचा आनंद व्यक्त केला आणि प्रियांका चोप्राच्या हातात पहिल्यांदा भारतीने हे घड्याळ पाहिले होते. हे घड्याळ पाहताक्षणी भारतीला खूप आवडले होते. म्हणून व्लाॅगमध्ये भारतीने प्रियांकाला म्हटले की, “प्रियंका चोप्रा, मीही हे घड्याळ विकत घेतले … ऐकतेस का?”

हा भारतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि प्रियांका चोप्राने स्वतः तो पाहिला. Bvlgari ची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या प्रियांकाने भारतीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “मी पाहिलं, हे घड्याळ माझ्यापेक्षाही तुझ्यावर चांगले दिसते. तू पुढची Bvlgari ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेस! तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप प्रेम.”

Comments are closed.