भास्कर जाधव यांना मातोश्रीवरुन समज, चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटात तणावाचे वातावरण, नेमकं काय घ
भास्कर जाधव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरू असताना रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूणमध्ये (Chiplun) शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या प्रचारात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्ष पदासह 24 नगरसेवक पदांवर पक्षाचे उमेदवार रिंगणात असतानाही जाधव यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी सांगितले होते की, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून मी निवडणूक तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मी शब्द दिला असल्याने आता परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार आहे. या वक्तव्यांमुळे ठाकरे गटात प्रचंड नाराजी व्यक्त होत असल्याचे समजते.
Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांची नाराजी कायम
चिपळूणमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील विसंवाद मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे. या अंतर्गत कलहाचा विस्फोट आता निवडणूक तोंडावर झाला आहे. विनायक राऊत यांच्या दौऱ्यानंतरही भास्कर जाधव यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे. पक्षातील या गंभीर परिस्थितीची माहिती थेट मातोश्रीपर्यंत पोहोचली असून, वरिष्ठ पातळीवरून जाधव यांच्याशी संपर्क साधला गेल्याचे वृत्त आहे.
Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज?
ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भास्कर जाधव यांना “पक्षाला नुकसान होईल असे पाऊल उचलू नका” असा सल्ला उच्च पातळीवरून देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, भास्कर जाधव यांनी काल (दि. 27) दिवसभर रमेश कदम यांचा प्रचार केला आहे. आता मातोश्रीवरून समज दिल्यानंतर भास्कर जाधव काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.