Bhaskar jadhav on rajan salvi join shinde shivsena uddhav thackeray and shivsena dispute


मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. साळवी यांनी बुधवारी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. ते आज ( 13 फेब्रुवारी ) ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. अनेक माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले आहे.

वेगवेगळ्या मार्गानं उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद हा राजकारण, व्यवहार, लढाईत करावा लागतो. पण, हे साम, दाम, दंड, भेद नाही. याठिकाणी केवळ सुडाचे राजकारण सुरू आहे, असं भास्कर जाधव यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या मागचा शुक्लकाष्ठ संपता संपेना! पत्नीने दिलेल्या ‘त्या’ तक्रारीवरून न्यायालयाचा झटका

भास्कर जाधव म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडण्यासाठी काहीजणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेला माणूस या ना त्या मार्गाने गळाला लावायचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राजन साळवी हे प्रवेश करत असल्याचे कळते. उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचा, हा एककलमी कार्यक्रम तीन वर्षापासून सुरू आहे.”

“गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लोक जात आहेत, म्हणून आनंद होतोय, अशातला भाग नाही. उद्धव ठाकरे लोकांना थांबवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे येण्यासाठी भाग पाडले जात आहे. तिथे काही लोक आमिषे, दबाव, तपास यंत्रणाला बळी पडत आहे. वेगवेगळ्या मार्गानं उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहे,” असा आरोप जाधव यांनी केला.

“साम, दाम, दंड, भेद हा राजकारण, व्यवहार, लढाईत करावा लागतो. पण, हे साम, दाम, दंड, भेद नाही. याठिकाणी केवळ सुडाचे राजकारणा सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे 40 आमदार, 13 खासदार फोडले. देशाची आणि राज्याची सत्ता मिळली. तरीही, उद्धव ठाकरे दबावाला बळी पडत नाही, म्हणून सुडाचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे खचले नाहीत, त्यांनी हात टेकले म्हणून त्यांची झोप उडाली नाही. ‘टायगर जिंदा है’ हीच भीती त्यांना वाटत आहे,” असं जाधव यांनी सांगितले.

“जाणाऱ्यांना जाऊ दे, असं विधान पक्षप्रमुखांनी करणे योग्य आहे. थांबवून, समजवून आणि जे-जे देता येईल ते देऊन सुद्धा जाणारे जात असतील, तर पक्षप्रमुख काय म्हणणार? जाणाऱ्यांना जाऊ दे, मी जे राहतील, त्यांना घेऊन लढणार, असे पक्षप्रमुख म्हणतात. पण, पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारखी कार्यकर्त्यांनी वापरणे योग्य नाही,” असं जाधव यांनी म्हटले.

हेही वाचा : ठाकरेंचे 5 खासदार जाळ्यात आलेले, पण दोन वाघांनी नकार दिल्याने शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ला रेड सिग्नल?



Source link

Comments are closed.