A thief wearing a Modi mask मोदींच्या चेहऱ्याचा मास्क घालून घरफोडीचा प्रयत्न फसला, चोरटा सिसीटिव्हीत कैद

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीने मोबाईलच्या दुकानात चोरी करण्याचा कथित प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला, पण त्याआधीच हे संपूर्ण कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.

मोदींचा मुखवटा घातलेला एक चोर मोबाईलच्या दुकानात घुसण्याचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ही घटना रविवारी रात्री भिलवाडा येथील कराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली .

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती लोखंडी सळीने मोबाईल दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करताना दिसला, त्याने पंतप्रधानांचा चेहरा असलेला आणि राजकीय सभांमध्ये सर्रास दिसणारा मास्क घातला होता

कारेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी पुरण माल मीना यांनी पीटीआयला सांगितले की, चोरीच्या प्रयत्नादरम्यान संशयिताने आपला चेहरा नरेंद्र मोदींच्या मास्कने झाकला होता.

पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा मास्क

“चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसलेल्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असलेला मास्क घातला होता. मात्र, परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये त्याचा चेहरा दिसत असून, त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती मीना यांनी पीटीआयला दिली.

हेही वाचा :Digital India Completed 11 Years एकाच वर्षात २४ हजार कोटींचा व्यवहार, UPI ठरली जगातील सर्वात मोठी रिअल टाईम प्रणाली

दिवसा टेहळणी करायचा

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, तीच व्यक्ती दिवसभरात नरेंद्र मोदी मास्कशिवाय आणि त्याच कपड्यांमध्ये परिसरात फिरताना दिसली होती.

पोलिसांकडून अशीही माहिती मिळाली आहे की, चोरीच्या प्रयत्नाच्या ठिकाणापासून सुमारे ८०० मीटर अंतरावर असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात त्याच रात्री चोरी झाली होती. तथापि, सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीचा त्या चोरीत सहभाग होता की नाही, हे पोलिसांनी अद्याप निश्चित केलेले नाही.

“ज्या दुकानात चोरी झाली, तिथले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. त्यामुळे, त्या घटनेत तीच व्यक्ती सामील होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,” असे एसएचओ म्हणाले. संशयिताची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments are closed.