भीषण अपघात! कारने तीन दुचाकींना चिरडलं, एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी; भिवंडीच्या बाळासाहेब

भिवंडी अपघात बातम्या: भिवंडी शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावर भीषण (Accident News) अपघाताची घटना घडली. भरधाव कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात (Bhiwandi News) एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता इतकी होती की, एका दुचाकीस्वाराला उड्डाण पुलावरून थेट खाली फेकले गेल्याची धक्कादायक घटना घडली.

दरम्यानया अपघातात जखमी झालेल्या शाहरुख खान (३२) आणि आलम शाह (४७) यांना तातडीने भिवंडीतील (Bhiwandi News) लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील कारचालक यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त कारवर ‘ॲडव्होकेट’चा लोगो लावलेला होता.

Bhiwandi Accident : कारने तीन दुचाकींना चिरडले, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे उड्डाण पुलावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून शांतीनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे

Bhiwandi News: भिवंडीत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे भिवंडीकर हैराण

पावसाने जोर धरताच भिवंडी शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी प्रवास धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी काँक्रीट रस्त्यांना तडे गेले आहेत, पेव्हर ब्लॉक उखडले आहेत, तर डांबरी रस्ते पूर्णपणे खरडून निघाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना दररोज अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, खड्डे चुकवताना वाहनांचा तोल जाऊन  अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील वर्षी खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रभावी उपाययोजना झालेल्या नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Bhiwandi News: दरवर्षी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च, प्रत्यक्षा केवळ तात्पुरती मलमपट्टी?

दरवर्षी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि पाऊस होताच रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा खर्च नेमका कुठे होतो, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी भिवंडीकरांकडून होत आहे. “अजून किती जणांचा बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.