भिवंडीत फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

भिवंडी तालुक्यातील रानाळ परिसरातील एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. तसेच या गोदामात ठेवलेले प्लायवूड पूर्णतः जळून खाक झाले आहे.
Comments are closed.