रात्रपाळीहून घरी येताच पायाखालची जमीनच सरकली; पत्नीसह पोटच्या दोन्ही मुली लटकलेल्या अवस्थेत; भि

भिवंडी बातम्या: भिवंडी शहरातील फेणे गावात पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना पत्नीने तिन्ही मुलींसह घरात  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पती सकाळी कामावरून घरी परत आल्यावर ही घटना उघडकीस आली.  फेणे गावातील एका चाळीत हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली असून त्यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे. नक्की महिलेने कोणत्या कारणास्तव आपल्या मुलींसह ही आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट नसून घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (Thane News)

भिवंडीतील फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाल भारती हा यंत्रमाग कामगार असून पत्नी पुनिता (वय 32) व मुली नंदिनी (वय 12),नेहा (वय 07) व अनु (वय 04) यांसोबत राहत होता.

नक्की घडले काय?

लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आत मध्ये छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत.घटनास्थळी आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी मिळाली आहे.नक्की महिलेने मुलींसह आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे अजून स्पष्ट नसले तरी पोलिस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करण्यात गुंतले आहेत. अशी माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिलीय.

हेही वाचा:

https://www.youtube.com/watch?v=6xuo9zydlmy

अधिक पाहा..

Comments are closed.