Bhiwandi Election: भिवंडी महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती, 30 जागांवर भाजप, शिंदे गट 20 लढणार
भिवंडी निवडणूक 2026 : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती आहे. यात 90 जागेसाठी निवडणूक होणार असून 50 जागेवर महायुती लढणार असल्याची माहिती आहे. तर 50 जागेवर पूर्ण तयारी झाली आहे. इतर जागेसाठी महायुतीने (MahaYuti) अजूनही भूमिका घेतलेली नाही. फक्त भाजपच्या 30 जागा, तर शिवसेना शिंदे गट 20 जागेवर निवडणूक लढणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे(भिवंडी महानगरपालिका निवडणूक 2026)
Bhiwandi Election 2026 : भाजप आमदार महेश चौगुले यांचा पुत्र पहिल्यांदाच भिवंडीत निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यानज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार लढणार. तर ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते त्या ठिकाणी शिवसेनेचेf आणि उमेदवार लढणार असल्याची माहिती आहे. अशातच आता भिवंडीत महायुतीकडून भाजप आमदार महेश चौगुले यांचा पुत्र मीत चौगुले पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. वार्ड क्रमांक 1 मधून ते अर्ज भरणार आहेत. माजी महापौर यांच्या समोर अर्ज भरणार असल्याने ही लढाई आता प्रतिष्ठेची होणार आहे. दरम्यानउमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे बघायला मिळते आहे. तर मुलाचा अर्ज भरण्यासाठी आमदार महेश चौगुले कुटुंबासह पदाधिकारीहे सहभागी झाल्याचे बघायला मिळत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.