भिवंडी महापालिकेत काँग्रेसची मुसंडी; पण सत्ता स्थापनेसाठी मोठी कसरत, भाजपकडूनही तगडी फिल्डिंग
भिवंडी महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत (Bhiwandi Election Results 2026) काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेला नाहीये. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस (Congress) यांच्यासमोर इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. यात काँग्रेस 30, राष्ट्रवादी 12, आणि समाजवादी 6 आल्यास काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो,तर समाजवादी पक्षाच्या विरोधात रईस शेख यांनी बंड केला होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे समाजवादी सोबत येण्याची शक्यता कमीच असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेस 30, राष्ट्रवादी 12, कोणार्क विकास आघाडी 4 किंवा भिवंडी विकास आघाडी व अपक्ष असे 4 चा पाठिंबा घेत बहुमताचा आकडा मिळवत काँग्रेस सत्तास्थापन करू शकते.
तर दुसरीकडे भाजप देखील आपली सत्ता स्थापन करण्यासाठी मागे राहणार नाहीये. यात भाजप 22 आणि शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी (SP) 12 असे एकत्र येत 46 चा आकडा मिळवत सत्ता स्थापन करू शकते. तर भाजप 22 आणि शिवसेना 12 आणि समाजवादी 6 , कोणार्क विकास आघाडी 4 आणि भिवंडी विकास आघाडी एकता मंच 3 एकत्र येऊन 47 आकडा गाठून बहुमत मिळवू शकतात. त्यामुळे परिणामी आता नेमकं काय राजकीय गणित जुळतं आणि कुणाचा महापौर विराजमान होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भिवंडी महानगरपालिकेत मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे काँग्रेसने मुस्लीम व्होटबँक आणि पर्यायाने भिवंडी महानगरपालिकेवर वर्चस्व राखले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 47 प्रभागांमध्ये विजय मिळवला होता. भिवंडीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, परंतु 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले असून 47 जागा मिळाल्या होत्या परंतु यंदा फक्त 30 जागा वर त्यांना समाधान मानावा लागलं आहे.
Bhiwandi Municipal Corporation Election Results 2026 : महापालिका – भिवंडी निजामपूर
भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध
काँग्रेस – 30
समाजवादी – 6
राष्ट्रवादी (शपथ)- १२
राष्ट्रवादी (अप)
भाजप – 22
शिवसेना (शिंदे) – 12
शिवसेना(ठाकरे) –
कोणार्क विकास आघाडी – 4
भिवंडी विकास आघाडी – 3
अपक्ष -1
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.