महापालिकेच्या निवडणुकीनंतर भिवंडीत राडा, माजी महापौर विलास पाटलांच्या घरावर दगडफेक; पोलिसांकडून
भिवंडी विलास पाटील न्यूज: भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील (Vilas Patil) यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली. भाजप आमदार महेश चौगुले (Mahesh Choughule) यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे. दगडफेकीनंतर विलास पाटलांनी कुटुंबीयांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केलं.
महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. भिवंडीमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झाला, त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. दरम्यान भिवंडीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
दोनजण गंभीर जखमी- (Bhiwandi News)
भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक एकमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली. सध्या पोलीस यंत्रणेवर माजी महापौर विलास पाटील यांनी आरोप करत पोलीस प्रशासन यांच्या अपयश या ठिकाणी असल्याचा केला आहे. तर दुसरीकडे आमदार महेश चौगुले यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यामुळे या हाणामारीच्या घटनेत दोनजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी शशिकला सांगितले का? (भिवडी व्लास पाटील न्यूज)
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. पोलिसांना देखील मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शशिकांत बोराटे यांनी सांगितले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.