भिवंडी महानगरपालिकेवर यंदा कोणाचा झेंडा? भाजप काँग्रेसचा आणखी एक गड काबीज करणार?
भिवंडी महानगरपालिका निवडणूक 2026: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची (BNCMC) स्थापना 2002 मध्ये झाली. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ही भिवंडी (Bhiwandi News) निजामपूर या जुळ्या शहरांचे प्रशासन करते. भिवंडी महानगरपालिकेत 2020च्या प्रभाग रचनेनुसार एकूण 84 प्रभाग आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भिवंडीत एकूण मतदारांची संख्या 6 लाख 69 हजार 033 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या साधारण 3 लाख 80 हजार 623 इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 88 हजार 097 इतकी आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mahangarpalika Election 2026) 15 जानेवारीला मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारीला भिवंडी महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल. यंदा भिवंडीत चुरशीची लढाई रंगण्याची शक्यता आहे.
Bhiwandi News: भिवंडी शहराचा इतिहास
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचा इतिहास खूप समृद्ध आहे. भिवंडी शहराची स्थापना 8व्या शतकात झाली होती, जेव्हा ते राजा भीमदेवाच्या शासनाखाली होते. तेव्हा त्याला भीमदी म्हणून ओळखले जायचे, जे कालांतराने भिवंडी झाले. 16 व्या शतकात भिवंडी शहर हे एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात होते. याठिकाणी बंदर असल्यामुळे येथून कपडे, मसाले आणि अन्य गोष्टींचा व्यापार होत असे. 1657 मध्ये, शिवाजी महाराजांनी भिवंडीला भेट दिली आणि त्याचे महत्व ओळखले. 1720 मध्ये, पेशवा बाजीरावाने भिवंडीला स्वराज्यात विलीन केले. त्यामुळे इतिहासात भिवंडी शहराचे स्थान कायमच महत्त्वाचे राहिले आहे.
Bhiwandi Election Result 2017: भिवंडी महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीचा निकाल
यापूर्वी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती. त्यावेळी या महानगरपालिकेत एकूम 90 प्रभाग होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 47 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 19, शिवसेनेला 12, समाजवादी पक्ष 2, कोणार्क आघाडी 4 आणि अन्य पक्षांना 10 प्रभागांमध्ये विजय मिळाला होता.
भिवंडी महानगरपालिकेत मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे काँग्रेसने मुस्लीम व्होटबँक आणि पर्यायाने भिवंडी महानगरपालिकेवर वर्चस्व राखले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 47 प्रभागांमध्ये विजय मिळवला होता. परंतु, अलीकडच्या काळात काँग्रेसची ताकद कमी झाल्याने भिवंडी महानगरपालिकेत पक्षाची वाताहात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी एमआयएम आणि अन्य पक्षांचा रस्ता धरला होता. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस पक्षाची वाताहात झाली आहे. तरीही भिवंडीतील काँग्रेस पक्षाचा जनाधार पूर्णपणे संपलेला नाही. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने महानगरपालिकेतील आपली ताकद वाढवली आहे. गेल्या निवडणुकीत एकसंध असलेल्या शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. मात्र, भिवंडी महानगरपालिका ठाण्याला लागून असल्याने याठिकाणी शिंदे गटाचीही बऱ्यापैकी ताकद आहे.
भिवंडी महानगरपालिकेतील संख्याबळ
एकूण जागा-90
काँग्रेस- 47
भाजप-19
शिवसेना-12
समाजवादी पक्ष-2
कोणार्क आघाडी-4
इतर-10
Bhiwandi Reservation: भिवंडी महानगरपालिकेतील आरक्षण
* अनुसूचित जाती (SC) – ३ जागा त्यापैकी २ जागा महिला प्रवर्गासाठी राखीव
* अनुसूचित जमाती (ST) – १ सर्वसाधारण ST जागा आरक्षित
* नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) – २४ जागा, त्यातील १२ जागा OBC महिला यांच्यासाठी राखीव
* सर्वसाधारण (Open) – ६२ जागा, त्यातील ३१ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव
* यामुळे सर्व प्रवर्गांमध्ये महिला उमेदवारांना संतुलित आणि व्यापक प्रतिनिधित्व मिळणार आहे.
भिवंडी महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम (Bhiwandi Election 2026)
नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
भिवंडी महानगरपालिका महत्त्वाच्या प्रभागांचा निकाल खालीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १
विलास पाटील, कोणार्क वि. आघाडी
प्रतिभा पाटील, कोणार्क वि. आघाडी
सविता कोलेकर, कोणार्क वि. आघाडी
नितीन पाटील, कोणार्क वि. आघाडी
www.abpmajha.in
प्रभाग क्रमांक 2
अन्सारी नमरा औरंगजेब, काँग्रेस
मिसबा इम्रान खान, काँग्रेस
इम्रान वली मोहम्मद खान, काँग्रेस
अहमद सिद्दीकी, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्रमांक 3
शरद धुळे, आरपीआय
धनश्री पाटील, आरपीआय
रिहाना सिद्दीकी, आरपीआय
विकास निकम, आरपीआय
www.abpmajha.in
प्रभाग 4
अर्शद अन्सारी, काँग्रेस
शबनम अन्सारी, काँग्रेस
अंझुम सिद्दीकी, काँग्रेस
अरुण राऊत, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग 5
मोमीन मलिक, काँग्रेस
जरीना अन्सारी, काँग्रेस
शमीम अन्सारी, काँग्रेस
फराज बहाउद्दीन, काँग्रेस
प्रभाग 6
सायली शेटे, काँग्रेस
रसिका राका, काँग्रेस
परवेज मोमीन, काँग्रेस
जावेद दळवी, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्रमांक 7
1. मोमीन साजेदा बानो इश्तियाक, काँग्रेस 2. राबिया मकबुल हसन खान, काँग्रेस 3. मोमीन सिराज ताहिर, काँग्रेस 4. अन्सारी मोहम्मद वसीम मोहम्मद हुसेन, काँग्रेस
प्रभाग क्रमांक 8
1. मोमीन तल्हा शरीफ हसन, काँग्रेस 2. शेख शकीरा बानो इम्तियाज अहमद, काँग्रेस 3. शेख समिना सोहेल (लव्वा), काँग्रेस 4. मोमीन शफ अल्ताफ, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्रमांक 9
1. लाड प्रशांत अशोक, काँग्रेस 2. फरजाना इस्माईल मिर्ची, काँग्रेस 3. अन्सारी राबिया मोहम्मद शमीम, काँग्रेस 4. अन्सारी तफज्जुल हुसेन मकसूद हुसेन, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 10
1. अन्सारी झुबेर अहमद मोहम्मद. फारुख, काँग्रेस २. अन्सारी शिफा अशफाक, काँग्रेस ३. खान खशाफ अश्रफ, काँग्रेस ४. खान आरिफ मोह हनीफ, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 11
1. स्वाती भगत, सपा 2. अन्सारी रेश्मा बानो मोहम्मद हलीम, काँग्रेस 3. अन्सारी अब्बास जलीला अहमद, सपा 4. अन्सारी नसरुल्ला नूर मोहम्मद, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 12
1. खान नादिया इरशाद, काँग्रेस 2. खान रजिया नसीर, काँग्रेस 3. अन्सारी साजिद हुसेन तफज्जुलहुसैन, काँग्रेस 4. अन्सारी मो. हलीम मो. हारुन, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 13
1. मनिषा दांडेकर, शिवसेना 2. संजय म्हात्रे, शिवसेना 3. अस्मिता नाईक, शिवसेना 4. बाळाराम चौधरी, शिवसेना
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 14
1. फिरोजा शेख, काँग्रेस 2. एच मोह याकुब अन्सारी, काँग्रेस 3. मिर्झा जाकीर, काँग्रेस 4. खान मातलुब, काँग्रेस
www.abpmajha.in
प्रभाग क्र. १५
1. मदन नाईक, शिवसेना 2. खान सुगरबी हाजी शहा, शिवसेना 3. गुलाब नाईक, शिवेसणा प्रभाग क्र. 16 1. पद्मा कल्याडप, भोप 2. क्षामा ठाकूर, अतिरिक्त 3. दिलीप कोठारी, भाजपा 4. नित्यानंद नाडर, भाजपा
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 17
1. नंदनी गायकवाड, भाजप 2. मिना कल्याडप, भाजप 3. संतोष शेट्टी, भाजप 4. सुमित पाटील, भाजप प्रभाग नं 18 1. कामिनी पाटील, भाजप 2. दर्शना गायकर, भाजप 3. सिद्दीकी शाहीन फरहान, भाजप 4. सुहास नकाते, भाजप
www.abpmajha.in
प्रभाग क्रमांक १९
1. अन्सारे शकला, काँग्रेस हदीज, काँग्रेस 4. खान मुर्तर आले, काँग्रेस प्रभाग क्र.
www.abpmajha.in
प्रभाग क्र. 21
1. अशोक भोसले, शिवसेना 2. वंदना काटेकर, शिवसेना 3. अलका चौधरी, शिवसेना 4. मनोज मोतीराम, शिवसेना
प्रभाग क्र. 22
1. दीपाली पाटील, अपक्ष 2. तुषार चौधरी, शिवसेना 3. श्याम अग्रवाल, भाजप प्रभाग नं 23 1. हरिश्चंद्र, भाजप 2. चौधरी अस्मिता राजेश, भाजप 3. पाटील योगिता महेश, भाजप 4. चौधरी हनुमान रामू, भाजप
Comments are closed.