भुसावळमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलींचे मृतदेह विहिरीमध्ये सापडले; क्लासला जाताना नेमकं काय घडलं? घ
भुसावळ: जळगावमधील भुसावळ तालुक्यातील साकरी येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह (Bhusawal Crime News) विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुली या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी शिकवणीसाठी जात असताना ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत मुली (Bhusawal Crime News) सापडल्या, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून या दोघींच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.(Bhusawal Crime News)
शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत पडल्या असल्याचा संशय बळावला
विहिरीत पडलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी विविध चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. घटनेमुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुली नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ (Bhusawal Crime News) उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत पडल्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आल्या.(Bhusawal Crime News)
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील (Bhusawal Crime News) पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला, अपघात की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Bhusawal Crime News)
एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे
या घटनेबाबात माहिती देताना पोलिस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी म्हणाले, आज सकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्षे आहे. तक्रार मिळताच आम्ही शोध सुरू केला. यावेळी साखरी गावाजवळ विहीरीत दोन मृतदेह आढळून आले दोन्ही मृतदेह आम्ही पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत, ही घटने नेमकी कशी घडली याचा तपास सुरू आहे, एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे, याप्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला की बाकी माहिती तुम्हाला देण्यात येईल असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.