Bhutan earthquake – भूतान भूकंपाने हादरले! 3.1 रिश्टर स्केलची नोंद

गुरुवारी सकाळी भूतानमध्ये पहाटे 4.29 च्या सुमारास तीव्र भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुासर, भूतानमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. भूकंपाची खोली फक्त 5 किलोमीटर होती, त्यामुळे भूकंपानंतरचे धक्के येण्याची शक्यता आहे.
भूतानमध्ये यावर्षी झालेला हा पहिला भूकंप नाही. याआधी 8 सप्टेंबर 2025 रोजी भूतानमध्ये दोन भूकंप झाले होते. पहिला भूकंप 2.8 रिश्टर स्केलचा होता, जो दुपारी 12.49 वाजता 10 किलोमीटर खोलीवर नोंदला गेला. दुसरा भूकंप 4.2 रिश्टर स्केलचा होता, जो सकाळी 11.15 वाजता आला. दोन्ही भूकंप भूतानच्या वेगवेगळ्या भागात जाणवले. भूकंप तज्ञांच्या मते, पृष्ठभागावरील भूकंप अधिक धोकादायक मानले जातात कारण त्यांचे हादरे जमिनीवर लवकर आणि जास्त तीव्रतेने पोहोचतात, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते.
भूतान जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. भूतान केवळ भूकंपांनाच नव्हे तर इतर विविध नैसर्गिक आपत्तींनाही बळी पडतो.
Comments are closed.