फिरकीच्या तालावर! एक सामना, चार षटके आणि 8 फलंदाजांची दांडी गुल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर ज्या देशाच नाव अद्याप म्हणाव तसं झळकलं नाही, त्याच देशाच्या एका 22 वर्षीय खेळाडूने साऱ्या जगाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. भूतानाच डावखूरा फिरकीपटू सोनम येशेने फलंदाजांची चांगली फिरकी घेतली आणि चार षटकांमध्ये फक्त 7 धावा देत 8 विकेट घेतल्या. सोनमच्या अचूक माऱ्यामुळे म्यानमाराची घसरगूंडी झाली आणि संपूर्ण संघ अवघ्या 45 धावांमध्ये बाद झाला.

सोनम येशे हा टी20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात 8 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी धुवांधार कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आली नाही. भूतान आणि म्यानमार यांच्यात पार पडलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सोनमची गोलंदाजी लक्षवेधी ठरली. त्याने तिसऱ्या टी-20 सामन्यात चार षटके फेकली, एक षटक निर्धाव टाकलं आणि 8 फलंदाजांना तंबुत धाडलं. भूतानने म्यानमारचा सुपडा साफ करत 5-0 अशा फरकाने मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सोनमने पाच सामन्यांमपैकी चार सामने खेळले आणि चार सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या.

विराट, कसोटीत परत ये! सिद्धूची काळजाला भिडणारी हाक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाच टी-20 सामन्यात आठ विकेट घेणारा सोनम पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तर सात विकेट घेण्याची कामगिरी दोन खेळाडूंनी केली आहे. यापूर्वी मलेशियाच्या स्याजरूल इदरसने चीनविरुद्ध 2023 साली सात विकेट घेतल्या होत्या आणि बहरीनच्या अली दाऊदने याच वर्षी भूतानविरुद्ध 7 विकेट घेतल्या होत्या. महिला आणि पुरुष क्रिकेटचा विचार करता गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रम इंडोनेशियाच्या महिला संघाच्या रोमालियाच्या नावावर आहे. तीने मंगोलियाविरुद्ध एकही धाव न देता 7 विकेट घेतल्या होत्या.

Comments are closed.