IPL इतिहासातील महारथी! फक्त या भारतीय गोलंदाजांनी जिंकली दोनदा पर्पल कॅप
जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगला (आयपीएल) 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सर्व संघाचे खेळाडू सरावात व्यस्त आहेत. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्यांना खास बक्षिस दिले जाते. जसे की स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिले जाते. वास्तविक, पाहायला गेले तर आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ दोन भारतीय गोलंदाजांनी दोन वेळा पर्पल कॅप जिंकण्याचा विक्रम केला आहे. चला तर ते दोन गोलंदाज कोण आहेत ते जाणून घेऊया.
आयपीएलमध्ये दोनदा पर्पल कॅप जिंकणारे खेळाडू-
भुवनेश्वर कुमार – 2016, 2017
हर्षल पटेल – 2021, 2024
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने 2016 आणि 2017 मध्ये सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकली. 2016 मध्ये त्याने 23 विकेट्स घेत आपला संघ चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 2017 मध्ये त्याने आणखी प्रभावी कामगिरी करत 26 विकेट्स घेत पुन्हा पर्पल कॅप मिळवली.
हर्षल पटेलने 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी खेळताना 32 विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती. त्यानंतर 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने पुन्हा सर्वाधिक विकेट्स घेत हा सन्मान पटकावला. विशेष म्हणजे, हर्षल पटेल हा आयपीएल इतिहासात दोन वेगवेगळ्या संघांसाठी पर्पल कॅप जिंकणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारतीय खेळाडू व्यतिरिक्त, ड्वेन ब्राव्हो (2013, 2015) आणि कासिगो रबाडा (2020, 2023) यांनीही दोन वेळा हा सन्मान मिळवला आहे. मात्र, सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे.
आयपीएल 2024 नंतर हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार हे दोनच भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी दोनदा हा किताब जिंकला आहे.
Comments are closed.