भुवनेश्वरचे संघात पुनरागमन, स्मृतीच्या नेतृत्वाची सुरुवात; हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांची निवड

बीसीसीआयने मंगळवारी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाची निवड केली आहे. हिंदुस्थानचा पुरुष संघ न्यूझीलंडच्या दौऱयात टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत पाच टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. यानंतर हिंदुस्थानच्या वन डे आणि कसोटी संघांची घोषणा करण्यात येणार आहे. महिलांचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे.

पुरुषांचा टी-20 संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयांक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव.

महिलांचा टी-20 संघ ः स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी. कामलिनी (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतीमनी कलिता, मिन्नू मानी.

महिलांचा एकदिवसीय संघ ः स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतीका रावल, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), वैष्णवी शर्मा, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, सायली सातघरे, रेणुका ठाकूर.

Comments are closed.