भारतात होणार ‘बिग बॅश लीग’चा थरार! बीसीसीआयच्या मदतीने ऑस्ट्रेलिया देणार पाकिस्तानला मोठा झटका

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएलच्या धर्तीवर बिग बॅश लीग (BBL) सुरू केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या लीगची क्रेझ कमी झाल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता ही लीग पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी एक मोठी योजना आखली असून, याचा थेट फटका पाकिस्तानला बसू शकतो.
यांच्या रिपोर्ट्सनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2026-27 च्या बिग बॅश हंगामाचा पहिला सामना भारतात आयोजित करण्याचा विचार करत आहे. भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयकडे (BCCI) परवानगी मागितली असून, आता त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
काही आयपीएल संघ आता बिग बॅश लीगमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी ‘सिडनी थंडर’ आणि ‘मेलबर्न रेनेगेड्स’ सारख्या संघांशी चर्चा सुरू केली आहे. आयपीएल मालकांनी आधीच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका आणि युएई (IL20) मधील लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. आता असाच प्रकार बिग बॅशमध्येही पाहायला मिळू शकतो.
जर बिग बॅश लीगमध्ये भारतीय गुंतवणूक आणि बीसीसीआयची मदत मिळाली, तर ही लीग लोकप्रियतेच्या बाबतीत पाकिस्तान सुपर लीगला (PSL) मागे टाकू शकते. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या हंगामात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या लीगशी जोडला गेला होता, पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. बिग बॅशच्या एका हंगामात एकूण 44 सामने खेळवले जातात.
Comments are closed.