Champions Trophy; ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का.! संघाचा कर्णधार स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता
येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स व जोश हेझलवूड हे दोघेही खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेच्या समाप्तीपासून कमिन्स मैदानाबाहेर आहे. ज्यामध्ये तो संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरही गेला नाही. या दौऱ्यावर न येण्याचे एक कारण म्हणजे तो दुसऱ्यांदा वडील झाला आहे. या सोबतच कमिन्स त्याच्या टाचेच्या समस्येशी देखील झुंजत आहे. तर जोश हेझलवुड देखील दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्राॅफीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान या दोन्ही गोलंदाजांना त्रास झाला होता.
ऑस्ट्रेलियन संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये ते यजमान संघाविरुद्ध 2 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहेत. त्यानंतर ते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला रवाना होतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी पॅट कमिन्सबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे त्याच्यासाठी खूप कठीण वाटते. याशिवाय, जोश हेझलवूडही निर्धारित वेळेपर्यंत तंदुरुस्त होणे कठीण वाटत आहे, पुढील काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.
ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी 📢
पॅट कमिन्स आणि जोश हेझलवुड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये नाकारणार आहेत. [Code Cricket] pic.twitter.com/ytzgs4wi3p
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 5 फेब्रुवारी, 2025
सेन रेडिओला दिलेल्या निवेदनात मॅकडोनाल्ड म्हणाले की, “कमिन्सने अद्याप पुन्हा गोलंदाजी सुरू केलेली नाही, त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि या परिस्थितीत आपल्याला दुसऱ्या कर्णधाराची घोषणा करावी लागेल. हेझलवुडच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. वैद्यकीय टीमकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुढील काही दिवसांत निर्णय घेऊ.”
जर पॅट कमिन्स 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही. तर अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागेल. सध्या या शर्यतीत दोन नावे आघाडीवर आहेत. एक स्टीव्ह स्मिथचे आणि दुसरे सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडचे. स्टीव्ह स्मिथ सध्या श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो कर्णधार होण्याची खूप आशा आहे. ऑस्ट्रेलियन संघ या मेगा टूर्नामेंटमधील पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा-
वर्ल्ड रेकाॅर्ड..! वयाच्या 26 व्या वर्षी रशीद खानने घेतले सर्वाधिक टी20 विकेट्स, ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडित
डेव्हिड मिलरने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्स-फाफ डु प्लेसिस जवळपासही नाही
IND VS ENG; चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी रोहित विराटला फाॅर्ममध्ये परतण्याची शेवटची संधी, नाहीतर….
Comments are closed.