Asia Cup: बीसीसीआयचा पाकिस्तानला मोठा झटका! भारत आशिया कपमध्ये खेळणार नाही

भारत आणि पाकिस्तान मधील तणावानंतर आता आशिया कप बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. या दरम्यान बीसीसीआयकडून आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या स्पर्धेतून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय संघाला याच महिन्यात सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळायचा होता. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला सांगितले आहे की, ते पुढच्या महिन्यात श्रीलंकामध्ये होणाऱ्या महिला इमर्जिंग संघ आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या द्विवार्षिक पुरुष आशिया कपमध्ये खेळणार नाहीत.

सध्या आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नकवी आहेत, जे पाकिस्तान सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. याशिवाय ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे हेड सुद्धा आहेत. यामध्ये बीसीसीआयने स्पष्ट निर्णय घेत क्रिकेट बोर्डाला ही माहिती दिली आहे.

सूत्रांकडून रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बोर्डाने म्हटले की, आशियाई क्रिकेट कौन्सिलचे हेड एक पाकिस्तानी मंत्री आहेत. तिथे आम्ही क्रिकेट खेळू शकत नाही, ही आमच्या देशाची भावना आहे आणि आम्ही त्यांना हे स्पष्ट सांगितले आहे. तसेच भविष्यात सुद्धा खेळण्याच्या संभावना कमी आहेत. भारत सरकार सोबत क्रिकेट बोर्ड संपर्कात आहे.

बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आशिया कप विषयी शंका निर्माण झाल्या आहेत, की ही स्पर्धा होईल की नाही. कारण यजमान संघानेच स्पर्धेतून मागे होण्याचा निर्णय घेतला आहे. भारत यावर्षी आशिया कपचे आयोजन सप्टेंबरमध्ये करणार होता आणि आता बीसीसीआयने मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्पर्धा रद्द सुद्धा होऊ शकते, भारत शिवाय पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार होते. भारताशिवाय या स्पर्धेला काही अर्थच उरणार नाही.

Comments are closed.