आरसीबीला बसला मोठा फटका! बोर्डाची परवानगी न मिळाल्याने हा स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

IPL 2026 सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंच्या दुखापतींनी संघांची चिंता वाढवली आहे. RCB चा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड दुखापतीमुळे आधीच सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. आता बातमी येत आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा आणखी एक वेगवान गोलंदाज IPL 2026 चा भाग असणार नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा आहे. त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून IPL खेळण्याची परवानगी मिळू शकलेली नाही.
जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत नुवान तुषारा IPL 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याने यापूर्वीही RCB साठी चमकदार कामगिरी केली होती. ‘न्यूजवायर’च्या ताज्या अहवालानुसार, नुवान तुषाराला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून एनओसी (नो-ऑपरेशन प्रमाणपत्र) मिळालेले नाही. क्रिकेट बोर्ड सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी घेते आणि त्यानुसारच त्यांना खेळण्याची परवानगी देते. रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नुवान आवश्यक ‘फिटनेस पॉइंट्स’ मिळवू शकला नाही आणि याच कारणामुळे त्याला IPL 2026 साठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने NOC दिलेली नाही.
जोश हेझलवूड जरी RCB साठी सुरुवातीचे सामने खेळणार नसला, तरी तो नंतर उपलब्ध होणार आहे. पॅट कमिन्सदेखील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नाही, परंतु तो भारतात दाखल झाला आहे. तो SRH (सनरायझर्स हैदराबाद) संघाशी जोडला गेला असून त्याने सरावही सुरू केला आहे. रिपोर्ट्सनुसार, जोश हेझलवूड देखील आज भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. तो RCB च्या कॅम्पचा भाग असेल, पण सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.
जोश हेझलवूड सुरुवातीला उपलब्ध नाही, तर दुसरीकडे नुवान तुषारा IPL 2026 मधून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे. अशा परिस्थितीत, RCB च्या गोलंदाजीच्या संयोजनावर (Bowling Combination) सर्वांचे लक्ष असेल. ‘ESPNCricinfo’ च्या रिपोर्टनुसार, २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, मंगेश यादव आणि जेकब डफी RCB च्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
Comments are closed.