गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू खेळणार नाही प्लेऑफचे सामने

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स सुरुवातीपासूनच ट्रॉफी जिंकण्यासाठी महत्त्वाची दावेदार ठरताना दिसत आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ पॉईंट्स टेबलमध्ये टॉपच्या स्थानी विराजमान आहे. गुजरातला वरच्या स्थानावर टिकून राहण्यासाठी जोस बटलरने संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याने आत्तापर्यंत स्पर्धेत 500 धावा केल्या आहेत. आता गुजरात संघासाठी एक मोठा चिंतेचा विषय हा आहे की, बटलर प्लेऑफचे सामने खेळणार नाही? तसेच त्याच्या जागी संघात कुसल मेंडिसला स्थान देण्यात आले आहे.

गुजरात टायटन्सने आतापर्यंत 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. तसेच त्यांचे स्पर्धेतील 3 सामने उरले आहेत. इएसपीएन क्रिकइन्फो नुसार राहिलेल्या 3 सामन्यांमध्ये जोस बटलर खेळणार आहे, पण प्लेऑफच्या सामन्यात त्याच्या जागी कुसल मेंडीस याला रिप्लेस करण्यात आले आहे. मेंडीस मागच्या आठवड्यापर्यंत पीएसएल 2025 मध्ये खेळत होता. पण आता सुरक्षेच्या कारणाने तो पाकिस्तानमध्ये पुन्हा जाऊ इच्छित नाही. त्यामुळे तो सध्या आयपीएलमध्ये सामील होत आहे, त्याने याआधी आयपीएल कधीही खेळली नाही.

जोस बटलर आयपीएल 2025 प्लेऑफचे सामने यासाठी खेळणार नाही, कारण 29 मे पासून इंग्लंड आणि वेस्टइंडिज दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. तसेच याच दिवसापासून आयपीएलचे प्लेऑफचे सामने सुरू होत आहेत. जर जोस आयपीएल प्लेऑफचे सामने नाही खेळू शकला, तर अशा परिस्थितीत गुजरातकडे यष्टीरक्षकाच्या स्वरूपात दोन पर्याय असतील. कुमार कुशाग्र आणि अनुज रावत यांनाही बटलरच्या जागी खेळवले जाऊ शकते.

गुजरातने आतापर्यंत आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले नाही. पण अजून एक विजय त्यांची अंतिम 4 मध्ये जागा पक्की करू शकतो. गुजरातला दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यासोबत उरलेले तीन सामने खेळायचे आहेत.

Comments are closed.